1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली आणि द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक आणि परस्परांच्या हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबत चर्चा केली.
2. पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे ऑगस्ट 2020 मध्ये संसदीय निवडणुकीत उल्लेखनीय विजय मिळवत पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी त्याबद्ददल मोदी यांचे आभार मानले आणि त्यांच्या सोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले..
3. दोन्ही नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये आणि महिंदा राजपक्षे यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये केलेल्या यशस्वी भारत दौऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला. या दौऱ्यांमुळे निश्चित राजकीय दिशा निर्धारित झाली आणि भावी संबंधांचा दृष्टीकोन स्पष्ट झाला.
4. कोविड-19च्या महामारीच्या काळात त्याविरोधातील लढ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदेशातील देशांना पाठबळ आणि मदत देण्याच्या दृष्टीकोनाच्या आधारे केलेल्या खंबीर नेतृत्वाची राजपक्षे यांनी प्रशंसा केली. सध्याच्या स्थितीमुळे द्विपक्षीय संबंधांना अतिरिक्त चालना देण्याची एक नवी संधी निर्माण झाली असल्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. कोविड-19 च्या महामारीला तोंड देण्यासाठी भारत आणि श्रीलंका परस्परांच्या समन्वयाने काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.या महामारीचा श्रीलंकेच्या आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम किमान राखण्यासाठी सर्वतोपरी पाठबळ देण्याची भारताची वचनबद्धता यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
5. द्विपक्षीय संबंधांना आणखी चालना देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी खालील मुद्यांवर सहमती व्यक्त केली:
(i) दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यांना प्रतिबंध घालण्यासाठी गुप्तचर यंत्रणा, माहितीची देवाणघेवाण, मूलतत्ववाद प्रतिबंध आणि क्षमता वृद्धी या क्षेत्रांसह संबंधित क्षेत्रात सहकार्य वृद्धींगत करणे.
(ii) सरकार आणि श्रीलंकेची जनता यांनी निर्धारित केलेल्या प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रात फलदायी आणि कार्यक्षम विकास भागीदारी सुरू ठेवणे आणि 2020-2025 या काळासाठी हाय इम्पॅक्ट कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट(एचआयसीडीपी) या सामंजस्य करारांतर्गत बेटावरील व्यवहार सुरू ठेवणे.
(iii) 2017 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या वेळी जाहीर केलेल्या मळ्यांच्या भागात 10,000 घरकुलांच्या उभारणीचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करणे.
(iv) दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करणे आणि कोविड-19 महामारीने निर्माण केलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पुरवठा साखळीचे एकात्मिकरण आणखी वाढवणे.
(v) बंदरे आणि उर्जा क्षेत्रासह पायाभूत सुविधा आणि दळणवळण प्रकल्पांना द्विपक्षीय करार आणि सामंजस्य करारांनुसार सखोल चर्चा करून लवकर मान्यता देणे आणि दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल अशा विकासकारक सहकार्यासाठी भक्कम वचनबद्धता राखणे
(vi) अपांरपरिक उर्जा क्षेत्रात विशेषतः भारताकडून 100 दशलक्ष डॉलरच्या कर्जाद्वारे उभारल्या जाणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पावर विशेष भर देऊन सहकार्य वृद्धिंगत करणे
(vii) कृषी, पशुसंवर्धन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि आयुष (आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपथी) क्षेत्रात तांत्रिक सहकार्य मजबूत करणे तसेच अधिक व्यावसायिकांच्या प्रशिक्षणाद्वारे कौशल्य विकास करणे जेणेकरून दोन्ही देशांमधील लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाची पूर्ण क्षमता लक्षात येईल.
(viii) बौद्ध, आयुर्वेद आणि योग यासारख्या संस्कृती संबंध आणि सामान्य वारसा या क्षेत्रातील संधींचा शोध घेऊन जनता-जनतेतील संबंध आणखी बळकट करणे. बौद्ध धर्माचे महत्त्व ओळखून आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या पवित्र शहर कुशीनगर येथे उद्घाटन झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्रीलंकेतील बौद्ध यात्रेकरूंच्या प्रतिनिधींच्या भेटीसाठी भारत सरकार सुविधा पुरवेल.
(ix) दोन्ही देशांदरम्यान संपर्कसुविधेसाठी एअर बबलच्या माध्यमातून प्रवास सुरु करणार, कोविड–19 मुळे निर्माण झालेली भीती पाहता सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले जाणार.
(x) नियमित सल्लामसलत आणि द्विपक्षीय प्रतिनिधींद्वारे मच्छिमारांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी युएनच्या शाश्वत विकास ध्येयासह सध्याचा आराखडा सामायिक केला जाईल.
(xi) संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात कर्मचार्यांच्या परस्पर भेटी, सागरी सुरक्षा सहकार्य आणि श्रीलंकेला सहकार्य यासह दोन्ही बाजूंच्या सशस्त्र सैन्यामध्ये सहकार्य मजबूत करणे.
6. दोन्ही देशांदरम्यान बौद्ध संबंधांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 15 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या सहाय्याबद्दल पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी स्वागत केले आहे. या सहाय्यामुळे दोन्ही देशांदरम्यान बौद्ध क्षेत्रात जनतेमध्ये परस्पर संबंध, बौद्ध विहारांची उभारणी, नूतनीकरण, क्षमता विकास, सांस्कृतिक देवाणघेवाण, पुरातत्व सहकार्य, बुद्धांच्या अवशेषांचे परस्पर प्रदर्शन, बौद्ध अभ्यासक आणि भिखू यांच्यातील संबंध बळकट करणे.
7. पंतप्रधान मोदी यांनी तमिळ जनतेच्या समानता, न्याय आणि शांतता या इच्छेच्या मागणीसाठी श्रीलंका सरकारसोबत चर्चा केली आणि श्रीलंकेच्या राज्यघटनेत केलेल्या तेराव्या दुरुस्तीसह सलोखा प्रक्रिया पुढे नेली. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या लोकांच्या इच्छेनुसार पाळला जाणारा सलोखा साधून आणि तामिळ लोकांसह सर्व वंशीय लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दिशेने काम करेल असा विश्वास व्यक्त केला आणि घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी केली.
8. दोन्ही नेत्यांनी सार्क, बिमस्टेक, आयओआरए आणि संयुक्त राष्ट्रसंघटना व्यवस्थेच्या माध्यमातून प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर परस्पर प्रतिबद्धता दोन्ही नेत्यांनी मान्य केली.
9. दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया दरम्यान प्रादेशिक सहकार्यासाठी बिमस्टेक महत्त्वाचे व्यासपीठ आहे हे लक्षात घेऊन, दोन्ही नेत्यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणाऱ्या बिमस्टेक परिषदेच्या यशस्वीतेसाठी कार्य करण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.
10. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताची 2021-2022 कार्यकालासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अस्थायी सदस्यपदी निवड होताना मिळालेल्या मजबूत आंतरराष्ट्रीय पाठिंब्याबद्दल अभिनंदन केले.