ताडोबा-अंधारी इथल्या व्याघ्र प्रकल्पाच्या अतिरिक्त क्षेत्रात, खाजगी शेतमालकांच्या जमिनीवर शेतीची जमीनमालकी कायम ठेवून, वन्यजीव व्यवस्थापन उपक्रम राबवले जाणार आहेत.
देशातल्या व्याघ्र संवर्धन आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठीचा ”कम्युनिटी नेचर कन्झरवंसी” या उपक्रमाअंतर्गत हा अभिनव प्रयोग राबवला जाणार आहे.
यासाठी ताडोबा फाउंडेशन आणि शेतकऱ्यांमध्ये एक संयुक्त करारही केला गेला आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी प्रतिएकर ५ हजार रुपये इतका मोबदला दिला जाणार आहे. अशाप्रकारचा हा पहिलाच करार असून २२ शेतकऱ्यांच्या एकूण १०४ एकर जमिनींबाबत हा करार असून, अशाप्रकारचा हा पहिलाच करार आहे.
या कराराअंतर्गतच्या जमीनींवर शेतकऱ्यांनी उत्पन्न न घेता वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी मदत करायची अट लागू असेल.