राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयासंदर्भात विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपानेत्यांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
सभागृहात विरोधकांचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकार पळ काढत असून राज्यपालांनी याकडे लक्ष द्यावं, असं या शिष्टमंडळानं सांगितलं.
राज्य सरकार जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती निवडणुका घ्यायला तयार आहे, मात्र सभागृहाला सामोरं जाण्याची त्यांची तयारी नाही, अशी टीका फडणवीस यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना केली.
कोरोनास्थितीमुळे विधीमंडळ अधिवेशन घेता येत नसलं तर, या निवडणुकांचा प्रचार कसा करता येईल, असा सवाल त्यांनी केला.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत सरकारनं या निवडणुका पुढं ढकलल्या नाहीत, तर भाजपा फक्त ओबीसी उमेदवारांनाच तिकिट देईल, असं फडणवीस म्हणाले.
सोशल मीडिया पर अपडेट्स के लिए Facebook (https://www.facebook.com/industrialpunch) एवं Twitter (https://twitter.com/IndustrialPunch) पर Follow करें …