मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लोकसत्ता वृत्तपत्राच्या वर्धापनदिन समारंभात ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या मागणीकडे लक्ष वेधलं.
अभिजात दर्जासाठी केंद्राकडे मागणी करावी लागत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली. भाजपला सगळी सत्ता स्वत:कडे हवी असल्याचं सांगत ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली.