केंद्रीय अर्थ मंत्रालयानं अल्प बचत योजनांवरच्या व्याजदरात वाढ केली आहे. काही योजनांचे व्याजदर सुमारे पाऊण टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांवरच्या व्याज दरात शून्य पर्णांक ७ टक्के वाढ करण्यात आली असून आता या बचतीवर ७ पूर्णांक ७ दशांश टक्के व्याज मिळणार आहे. ५ वर्षाच्या मुदत ठेव योजनेचा व्याजदर अर्धा टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
या आधी यासाठी ७ टक्के व्याज मिळत होते ते आता साडे ७ टक्के व्याज मिळणार आहे. सुकन्या समृद्धी खाते योजनेवर शून्य पूर्णांक ४ दशांश टक्के वाढ करण्यात आली असून आता या योजनेवर ८ टक्के व्याज मिळणार आहे. इतरही योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. बचत खात्यावरचा व्याजदर जैसे थे असून १,२ आणि ३ वर्षांच्या मुदत ठेवींवर च्या व्याजदरातही वाढ झाली आहे.