बँकांना पीक कर्जापोटी दिला जाणारा 2 टक्के व्याज परतावा पुन्हा सुरु करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्र दिलं आहे.
केंद्रानं हा परतावा थांबवण्याचा निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला नाही. राज्यातल्या ७० लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुळात ही योजना सुरु करण्यात जिल्हा सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पीक कर्ज देणं शक्य व्हावं हा उद्देश होता. मोठ्या प्रमाणावर कर्जासाठी शेतकरी या बँकांवर अवलंबून असतात.
बँकांना ७ टक्क्यापेक्षा जास्त दरानं कर्ज वाटप करता येत नसल्याचं केंद्र शासनाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा निधी उभारणीचा खर्च व्यापारी बँकांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे केंद्र शासनाचं २ टक्के व्याज अनुदान बंद झाल्यानं या बँकांना आर्थिक नुकसान सोसावं लागेल. त्याचा बोजा शेतकऱ्यावर पडेल. त्यामुळे व्याज परतावा योजना पूर्ववत सुरु करुन केंद्रानं सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँकांना दिलासा द्यावा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडिया पर अपडेट्स के लिए Facebook (https://www.facebook.com/industrialpunch) एवं Twitter (https://twitter.com/IndustrialPunch) पर Follow करें …