राज्यात पूरस्थिती मुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती तसंच नव्या रस्त्यांच्या निर्मितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकार समन्वयानं काम करेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
रस्ते अनेक पीढ्यांपर्यंत टिकावेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
नागपूरमधल्या रेल्वे उड्डाण पुलांच्या भूमीपुजन आणि उद्घाटन कार्यक्रमात ते दूरदृश्य प्रणीलीच्या माध्यमाधून सहभागी झाले होते. तेव्हा ते बोलत होते.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे भूमीपुजन आणि उद्घाटन झालं.
नितीन गडकरी हे देशभरात उच्च दर्जाचे महामार्ग तयार व्हावेत यासाठी काम करत आहेत, राज्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगानं गुणवत्तापूर्ण रस्ते निर्मितीसाठी त्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोशल मीडिया पर अपडेट्स के लिए Facebook (https://www.facebook.com/industrialpunch) एवं Twitter (https://twitter.com/IndustrialPunch) पर Follow करें …