प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेस्तास कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्रिक अँडरसन यांच्याशी संवाद साधून पवन उर्जा क्षेत्राशी संबंधित मुद्यांवर चर्चा केली.
वेस्तास कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्रिक अँडरसन यांच्याशी अत्यंत वैचारिक देवाण घेवाण झाली, अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी ट्वीटद्वारे दिली. पवन उर्जा क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्यांवर आम्ही चर्चा केली. येणाऱ्या पिढ्यांसाठी भविष्यात जास्त स्वच्छ वातावरण निर्मिती करण्यासाठी भारत नवीकरणीय उर्जा क्षेत्रात करत असलेल्या प्रयत्नांची अधिक माहिती, आपण हेन्रिक यांना दिली असे पंतप्रधानांनी सांगितले.