मराठा आरक्षण प्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं तातडीनं राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केली. उदयनराजे आणि छत्रपती संभाजी यांची आज पुण्यात भेट झाली, त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ओबीसी समाजाच्या सवलती मराठा समाजाला द्या, प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह तयार करा, यासह सहा मागण्यांचं निवेदन राज्य सरकारकडे दिलं असून, त्या लवकर मार्गी लावाव्यात अशी मागणी, खासदार संभाजी राजे यांनी यावेळी बोलताना केली.
सोशल मीडिया पर अपडेट्स के लिए Facebook (https://www.facebook.com/industrialpunch) एवं Twitter (https://twitter.com/IndustrialPunch) पर Follow करें …